राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा सायंकाळी प्रमुख पाहुणे व्हिजिलन्स खात्याचे उपआयुक्त सागर देशपांडे व तुकाराम बँकेचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्या शुभहस्ते विजयी संघांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा व मेजर ध्यानचंद ट्रॉफी यांचा हॉकी जगतातील इतिहास सांगितला व पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर आयोजकांतर्फे प्रमुख पाहुण्यांचा शाल घालून व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
महाविद्यालय मुले विभागात विजेता संगोळी रायण्णा कॉलेज व उपविजेता संघ आरपीडी महाविद्यालय, महाविद्यालयीन मुली विजेता आरपीडी महाविद्यालय व उपविजेता जी एस एस कॉलेज, माध्यमिक विद्यालय विभागात विजेता एम व्ही भंडारी संघ व उपविजेता संघ दिशा इंग्लिश मीडियम स्कूल, माध्यमिक विद्यालय मुली विजेता संघ ताराराणी हायस्कूल खानापूर व व उपविजेता संघ यांनी भंडारी
यावेळी सुमारे 25 मुला मुलींच्या हॉकी संघांनी मेजर ध्यानचंद ट्रॉफी मध्ये सहभाग घेतला होता. हॉकी बेळगाव संघटना, बेळगाव जिल्हा युवा सक्षमीकरण व क्रीडा खाते आणि गटशिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा युवजन अधिकारी बी श्रीनिवास व बसवराज, गटशिक्षण खात्याच्या शारीरिक शिक्षण अधिकारी श्रीमती जे. बी. पटेल, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष विनोद पाटील, जय भारत फाउंडेशनचे बसवराज पाटील, दत्तात्रय जाधव, संजय शिंदे, मनोहर पाटील, गणपत गावडे, प्रकाश बिळगोजी, नामदेव सावंत, श्रीकांत आजगांवकर, अश्विनी बस्तवाडकर, आशा होसमनी, सविता हेब्बार, सविता वेसणे, सागर पाटील, विकास कलघटगी, आनंद आपटेकर, एस एस नरगोदी, गोपाळ खांडे, साकीब बेपारी, संदीप पाटील, भंडारी स्कूलचे शिक्षक प्रवीण पाटील, कल्लाप्पा हगीदळे, ताराराणी हायस्कूलच्या शिक्षिका अश्विनी पाटील, संगोळी रायण्णा कॉलेजच्या शिक्षिका करुणा व गिरीश माने आदी उपस्थित होते.