बेळगाव:भारत विकास परिषदेतर्फे 62 वा स्थापना दिवस, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सीए श्रीनिवास शिवणगी, डॉ. मिलिंद हलगेकर आणि डॉ. उज्वल हलगेकर उपस्थित होते.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, स्वामी विवेकानंद आणि भाविपचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. डॉ. जे. जी नाईक यांनी भारत विकास परिषदेची राष्ट्रीय ध्येयधोरणे स्पष्ट केली. डॉ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी डॉक्टरांचे सेवाकार्य आणि कर्तव्ये याबाबत विस्तृत माहिती दिली. सुहास गुर्जर यांनी मुख्य अतिथिंची ओळख करून दिली. प्रांताध्यक्षा स्वाती घोडेकर यांनी नवीन सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देवविली.
ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट श्रीनिवास शिवणगी आणि आयएम्एचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद हलगेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल सपत्निक शाल, पुष्गुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मानित
करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. मिलिंद हलगेकर आणि श्रीनिवास शिवणगी यांनी कृतज्ञता व्यक्त करून परिषदेच्या भावी राष्ट्रीय कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. यावेळी बेळगाव शाखा संस्थापक प्राचार्य व्ही. एन. जोशी, एन. बी. देशपांडे, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, किशोर काकडे, विजयेंद्र गुडी, रामचंद्र तिगडी, विनोद देशपांडे, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, मालतेश पाटील, अमर देसाई, कुबेर गणेशवाडी, ॲड. सचिन जवळी, पी. जे. घाडी, विजय हिडदुग्गी, रमेश पाटील, प्रा. अरुणा नाईक, सत्यवती शिवणगी, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, लक्ष्मी तिगडी, योगिता हिरेमठ, तृप्ती देसाई, प्रिया पाटील, रूपा कुलकर्णी, प्रतिभा हल्लेप्पणवर, ज्योत्स्ना गिलबिले, नीता हिडदुग्गी, सविता पाटील, शालिनी नायक आदि उपस्थित होते.