बेळगावच्या वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात कंडक्टर वरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी छेडलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.प्रसार माध्यमाशी बोलताना कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांची तुलना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी केली.
कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. लाल पिवळे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून वाहनात घातले. आंदोलक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
बस कंडक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झालेला कर्नाटक रक्षण वेदिकेचा अध्यक्ष नारायण गौडा याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना विरोधात गरळ ओकताना समिती आणि शिवसेनेची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना केल्यामुळे मराठी भाषिकात संतापाची लाट उसळली आहे.
शहरात दाखल होताच नारायण गौडा याने प्रसिद्धी माध्यमांसमोर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेसह स्थानिक राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. नेहमीप्रमाणे समिती विरुद्ध गरळ ओकताना त्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना केली.
https://www.facebook.com/share/v/12F6fZTNy6v/
तसेच समिती आणि शिवसेना यांच्यात काही फरक नाही. शिवसेना, समितीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी दहशतवादी एकसारखेच आहेत. बेळगावमधील मराठी गुंडांचे गैरवर्तन माझ्या निदर्शनास आले आहे. कर्नाटकच्या बसेसना काळे फासायचे बसवाहकाच्या तोंडून ‘जय महाराष्ट्र’ वदवून घ्यायचे वगैरे सर्व गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. बेळगाव मधून महाराष्ट्र एकीकरण समिती संपली असल्यामुळेच पोट दुखीने समिती असे कृत्य करत आहे अशी टीका केली.