*मी पाहिलेले स्वप्न बाई म्हणतात माझे !!!* *माजी आमदार संजय पाटील*
काँग्रेस आणि भाजप वारंवार एकमेकांवर टीकास्त्र सोडत असते त्यातच आता राजहंसगडाच्या विकासावरून सुरू असलेल्या राजकारणाचा चर्चेत आता माजी आमदार संजय पाटील यांनी उडी घेतली आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील भांडण आज पुन्हा एकदा तापलेले पाहायला मिळाले. माजी आमदार संजय पाटील यांनी आज राजहंसगडाला भेट दिली असता त्या ठिकाणी प्रसारमाध्यमाणशी बोलताना त्यांनी आमदार हेब्बाळकर यांची खिल्ली उडवली आहे .
त्यांनी यावेळी असे म्हटले की मी पाहिलेले स्वप्न आता लक्ष्मी हेबाळकर या कशा काय पूर्ण करू शकतात हा मुद्दा उपस्थित केला आहे तसेच त्यांनी हेबाळकर या जनतेची दिशाभूल करतात फसवणूक करतात असेही म्हटले आहे.
सध्या निवडणूक येत असल्याने लक्ष्मी हेबाळकर या मराठी माणसांची मते मिळविण्याकरिता मराठी माणसांना लक्ष करत असल्याचे यावेळी सांगितले तसेच त्यांचा मराठी मतांवर डोळा असून सध्या त्या विकासाचा पाढा वाचत असल्याचा आरोपही त्यांनी याप्रसंगी केला.
यावेळी त्यांनी आपण निवडून आल्यावर या ठिकाणी गडाला जाण्याकरिता पायवाट होती मात्र या ठिकाणी सर्वांना येण्याचा नाकरिता वाट सुलभ व्हावे आणि गडाचे संरक्षक भिंत मजबूत राहावे याकरिता अनेक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असल्याचे सांगितले तसेच आपण हे सर्व ठामपणे प्रोटोकॉल नुसार सांगत असल्याची माहिती यावेळी प्रसार माध्यमांना दिली.
तसेच गडाच्या विकास कमिटीला विश्वासात न घेता आमदार हेब्बाळकर यांनी परस्पर येथील कामे सुरू केल्या असल्यास चा आरोप देखील त्यांनी प्रसंगी केला.
यावेळी संजय पाटील यांनी तातडीने चार कोटी 16 लाख रुपयांचा नेते 2010 साली देण्यात आला होता असे सांगितले तर या निधीतून त्यांनी गटारीवरील रस्ते तटबंदी पिण्याचे पाणी सिद्धेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार तसेच भूस्खलन रोखण्यासाठी आवश्यकता उपाय करण्यात आले असल्याची माहिती दिली.
त्याचबरोबर प्रसिद्ध कलाकार नितीन देसाई यांनी गडाची पाहणी करून गडावर शिवरायांच्या मूर्तीच्या स्थापनेबाबत कल्पना दिली होती.
मात्र आपला पराभव झाला असल्याने पुढील कामकाज होऊ शकले नसल्याशी ची खंत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.मात्र आता माझे स्वप्न लक्ष्मी हेब्बाळकर या कशा काय पूर्ण करू शकतील असा प्रश्न उपस्थित केला.