संगीत कलाकार संघाचा नोव्हेंबर महिन्याचा कार्यक्रम बेळगावच्या सुप्रसिद्ध गायिका स्व. श्रीमती सुधाताई सोलापूरकर (नरगुंदकर) यांच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला असून यामध्ये युवा गायक योगेश रामदास आणि ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. सुधांशू कुलकर्णी यांचा मुख्य सहभाग असणार आहे.
त्यांच्याबरोबर सहभाग घेणारे सहवादक रवींद्र माने आणि अंगद देसाई हे आहेत. हा कार्यक्रम आय एम इ आर च्या सभागृहात रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता सुरु होणार आहे.
सुधाताई या संगीत महामहोपाध्याय पं. रामभाऊ विजापुरे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या सर्वात पहिल्या विद्यार्थिनी होत्या. सामाजिक कार्यकर्त्या, नगराध्यक्षा आणि संगीतविद्वान शांताबाई नरगुंदकर यांच्या त्या कन्या होत्या. पुणे आणि धारवाडच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे गायन प्रसारित व्हायचे. अथणी येथील सत्वशीला मुलींच्या शाळेत त्यांनी दीर्घकाळ विद्यादानाचे कार्य केले.
संगीत रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे संघातर्फे आवाहन करण्यात येत आहे.