महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केला पहाटे शहराचा दौरा
महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज पहाटे शहराचे दौरा केला आणि यावेळी त्यांनी कामात अचूकपणा करणाऱ्या सफाई कामगारांना चांगलाच दणका दिला.
यावेळी त्यांनी पहाटे उठून शहरात सायकल फेरी केली आणि नेमकी ग्राउंड जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी त्यांनी प्रभागांमध्ये जाऊन कचऱ्याची विल्हेवाट कशी करण्यात येते याची पाहणी केली.
त्याचबरोबर प्रत्येक वार्डात जाऊन कचऱ्याची वाहने जाण्यात का विलंब होतात हे लक्षात घेऊन अनेकांना कान पिचकारी दिल्या आणि नोटीस जारी केली. यावेळी त्यांच्या कारवाईने स्वस्त झालेले सफाई कामगार जागे झाले.
तसेच आयुक्तांनी जे कामगार बायोमेट्रिक करत आहेत त्यांना प्रोत्साहन दिले आणि उशिरा येणाऱ्यांना कडक नोटीस बजावली. यावेळी त्यांनी सकाळी हजेरी लावल्यामुळे अनेक कामगारांना चांगलीच शिकवणूक मिळाली.