बेळगाव महानगरपालिका आयुक्तपदी कार्यरत असणारे अशोक दुडगुंटी यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बी. शुभा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी बी. शुभा यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आयुक्त अशोक दुडगुंटी,अभियंत्या ने लक्ष्मी निपाणीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
वे तडकाफडकी पद्धतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मनपा वर्तुळात खळबळ माजली आहे. सध्या म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट सेलच्या संचालिका म्हणून कार्यरत असलेल्या शुभा बी. यांच्याकडे मनपाचा कारभार सोपविण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी त्यांचे महानगरपालिकेमध्ये आगमन झाले. त्यानंतर अधिकारी वर्गाने त्यांचे स्वागत केले त्यांनी अधिकारी वर्गाचा परिचय करून घेतला. बेळगावच्या संदर्भात योग्य कामकाज करण्याचे नियोजन असल्याचे सांगि