खासदार धैर्यशील माने यांनी याकरिता बेळगाव पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र
सीमा प्रश्नाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बेळगावला येणार असल्याचे कळवले आहे.महाराष्ट्र सरकारने आपली सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीने दि.१९ डिसेंबर रोजी टिळकवाडी येथील व्हॉक्सिन डेपो येथे आयोजित केलेल्या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहे.आपल्याला वाय प्लस सुरक्षा व्यवस्था असून आपल्या सुरक्षेची आणि प्रोटोकॉलची व्यवस्था करावी.माझ्या दौऱ्याचे वेळापत्रक सोबत जोडले आहे असे माने यांनी पत्रात नमूद केले आहे.
सकाळी साडे नऊ वाजता कोल्हापूर येथून निघून साडे अकरा वाजता बेळगावला पोचून महामेळाव्याला उपस्थित राहणार.दीड वाजता महामेळावा आटोपून पुन्हा कोल्हापूरला परतणार असा खासदार धैर्यशील माने यांचा दौरा आहे.आता माने यांच्या पत्राला पोलीस आयुक्त काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.