बेळगाव : जावयाने सासूचा खून केल्याची घटना खासबाग येथील रयत गल्लीमध्ये घडली आहे. 43 वर्षीय रेणुका पद्मुखी असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. मकर संक्रांती दिवशी मुलीला भेटण्यासाठी आलेल्या सासूची जावयाने निघृण हत्या केल्याची घटना खासबाग येथील रयत गल्लीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि रेणुका यांचा विवाह सात महिन्यांपूर्वी झाला होता. आरोपीची पत्नी तीन दिवसांपासून आजारी होती. मात्र, त्याच्या पत्नीची योग्य काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे रेणुका यांनी हस्तक्षेप करून मुलीवर उपचार केले. यावरून मुलाचे कुटुंबीय आणि मुलीच्या कुटुंबात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी आरोपीने सासूवर चाकूने वार केले. गंभीर जखमी महिलेचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
बेळगावमधील शाहपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभम बिर्जे, त्याची आई सुजाता बिर्जे आणि वडील दत्ता बिर्जे यांना अटक करण्यात आली.