7 वर्षाच्या बालिकेसह मातेने केली आत्महत्या
सात वर्षाच्या बालिकेसह एका मातेने आत्महत्या केल्याची घटना कित्तूर जवळील दिंडलकोप गावामध्ये उघडकीस आली आहे कौटुंबिक कलाहातून अवघ्या सात वर्षाच्या चिमुकलीसह माते ने गळफास घेतल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सात वर्षाची चिमुकली चांदणी इंचल आणि तिची आई महादेवी इंचल वय 34 राहणार दिंडलकोप यांनी आत्महत्या केली आहे. महादेवीचे पती सात वर्षांपूर्वी मरण पावले त्यामुळे महादेवी आपल्या माहेरी मुलीसह राहत होती.
या ठिकाणी काही काळाने कुटुंबातील मतभेद लक्षात घेऊन महादेवी स्वतंत्र राहण्याकरिता प्रयत्न करीत होती मात्र घरातील लोक तिला आक्षेप घेऊन विरोध दर्शवत होते अखेर तिने कौटुंबिक कलहातून आपले जीवन संपविले.
सदर घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच पुन्हा नोंद करून पुढील तपास हाती घेतला आहे.