आमदारांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन
उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी शाहूनगर अन्नपूर्णावाडी भागातील एका इमारतीत इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीतूनही आणखी मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.त्यानंतर ते म्हणाले की शहरात घडलेली ही घटना अंत्यत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे.त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहे. सध्या 2 लाख रुपयांची मदत करत आहोत. तसेच त्यांना आणखीन मदत करण्याचे आश्वासन यावेळी भेटीप्रसंगी दिले.