बेळगांव:उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सैठ यांनी अशोक नगर क्रीडा संकुलाची पाहणी केली. क्रीडा संकुल पुन्हा सुरू करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांसाठी क्रीडा आणि मनोरंजनाच्या सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने. क्रीडा संकुल मधील बॅडमिंटन कोर्ट आणि जिम लोकांसाठी पुन्हा उघडण्यात आले आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
याशिवाय संकुल मधील जलतरण तलावाचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.लवकरच नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल असे आमदार राजू शेठ यांनी सांगितले. तसेच पाहणी करतांना ते म्हणाले आणखी विस्तार करून परिसरात नवीन फुटबॉल आणि क्रिकेट ग्राउंड बांधण्याच्या योजनेची रूपरेषा आखल्याचे त्यांनी सांगितले.
या क्रीडा संकुलमुळे बेळगाव उत्तर मतदारसंघातील रहिवाशांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याचा व्यापक प्रयत्नाचा एक भाग आहे.अशोक नगर क्रीडा संकुलातील सुधारणामुळे स्थानिक क्रीडापटूंना संधी उपलब्ध होईल. आणि खेळामध्ये मोठ्या समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
<span;>याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी, युवा नेते अमन सेठ <span;>यांच्यासहित <span;>अधिकारी उपस्थित होते.