तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्यात आमदार रोहित पाटील यांनी मार्गदर्शन केले.
राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मराठा सांस्कृतिक भवन येथे युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर,शिवचरित्राचे अभ्यासक मधुकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार रोहित पाटील यांनी आपल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
मार्गदर्शन करताना आमदार रोहित पाटील म्हणाले या भागातील अस्मिता दडपण्याचा प्रयत्न होतोय.यासाठी आपल्या अस्मिता गहाण न ठेवता स्वाभिमानाने लढायला पाहिजे.
अनेक पिढ्या संपल्या पण सीमाप्रश्न संपला नाही.त्यामुळे माझी पिढी संपायच्या अगोदर हा प्रश्न संपवू.आपल्या लोकांवर अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन न करण्याची शिकवण मिळाली आहे.पराकोटीचा संघर्ष मला करावा लागला तर मी मागे हटणार नाही याची ग्वाही देतो असे आमदार रोहित पाटील म्हणाले.