आमदार , महापौरांनी केली विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी
बेळगाव:
आमदार राजू शेठ , महापौर मंगेश पवार यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी महापौर आणि आमदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना श्री गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत सूचना केल्या.
विसर्जन मार्गावर जे खड्डे असतील ते बुजवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत तारांचा जर अडथळा येत असेल तर त्या हटवण्याच्या ही सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर महापौर आणि आमदारांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. सर्व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत आणि लवकरात लवकर पार पाडावी , असेही आवाहन महापौर आणि आमदारांनी केले आहे. या पाहणी दौऱ्यावेळी आमदार, महापौर यांच्यासोबत पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे अधिकारी, तसेच गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
बेळगावच्या गणेशोत्सवाला एक मोठी परंपरा आहे. सुमारे 400 च्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होते. दरवर्षी पोलीस बंदोबस्तामध्ये विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेने पार पडते.
विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी