आमदारनी केली शासकीय अधिकाऱ्यांसोबत या भागाची पाहणी
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी उज्वल नगर आणि अमन नगर भागातील नगरसेवक आणि शासकीय अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी केली.
त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन परिसरातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या भागात योग्य रस्ते किंवा गटारी नाहीत. हे त्यांना समजले यांनी लोकांना आश्वासन दिले की ते शहराच्या या विकासाची काळजी घेतील .
तसेच हे काम प्राधान्याने केले जाईल याची देखील खात्री करून दिली .आमदारांच्या या भेटीमुळे रहिवाशांनी स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले