*आमदार अभय पाटील यांचा वॉर्ड क्रमांक 21 मध्ये सायकल फेरी जाणुन घेतल्या नागरी समस्या*
आमदार आपल्या दारी या उपक्रमात सायकल फेरी द्वारे वॉर्ड क्रमांक 21 मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्या साठी आमदार अभय पाटील यांनी या भागातील स्थानिक लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या व लवकरच या सर्व समस्या सोडविण्या साठी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व स्थानिक नगरसेविका प्रीती कामकर यांना लवकरात लवकर कामे पूर्ण करून नागरिकांना मदत करावी व त्यांच्या समस्या त्वरीत सोडवावा आणि या भागाचा विकास करावा.
अशा सूचना केल्या ही सायकल फेरी वर्धापा गल्ली, ऊपार गल्ली,ढोर गल्ली, ओल्ड पीबी रोड,श्रिंगारी कॉलनी, बाडीवाले कॉलनी टीचर्स कॉलनी, नागेंद्र कॉलनी, पाटील गल्ली, लिंगायत स्मशान भूमी,मारुती मंदिर,या मार्गावर वरून गेली यावेळी या भागातील नागरिकानी आमदार अभय पाटील यांचे आभार मानले व त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या सायकल फेरीत जयंत जाधव,समाजसेवक विनायक कामकर, सतीश पाटील, संतोष श्रिंगारी, विश्वनाथ येळूरकर, सुर्यकांत हिंडलगेकर अरविंद गुंजीकर, आनंद उपरी, प्रकाश श्रेयकर, तुकाराम शिंदे,बाळू मिराशी व या भागातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित व सहभागी झाले होते.