नागपंचमी सणानिमित्त रुग्णांना फळे आणि दुधाचे वाटप करण्यासाठी आज युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी बीम्स रुग्णालयाला भेट दिली. मात्र यावेळी हॉस्पिटलच्या लिफ्ट मधून जात असताना क्षमतेपेक्षा अधिक जण चढले असल्याने तांत्रिक बिघाड होऊन जवळपास 20 मिनिटे लिफ्ट बंद पडली.
त्यामुळे मंत्र्यांच्या पुत्राला जवळपास 20 मिनिटे लिफ्टमध्ये तात्काळत थांबावे लागले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. त्यांनी लागलीच प्रशासनाला याबाबत सांगितले त्यानंतर प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
यावेळी अल्पावधीत जिल्हा रुग्णालयाच्या तांत्रिक विभागाने लिफ्टचा तांत्रिक बिघाड दूर करून लिफ्ट मध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप आहे काढले. यांच्या समावेत त्यांचे चार-पाच समर्थक बीम्सचे दोघे डॉक्टर असे एकूण 15 जण अडकून होते
सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल लिफ्टमध्ये अडकून पडल्याची बातमी सोशल मीडियावर तुफान वेगाने वायरलदेखील झाली होती.
Thank you for sharing with us, I think this website genuinely stands out : D.
I really like what you guys tend to be up too. This sort of clever work and exposure! Keep up the great works guys I’ve you guys to blogroll.