गृहलक्ष्मी योजने करिता पैसे घेतल्यास फौजदारी गुन्हा करणार दाखल : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत जर ऑनलाईन सेंटर मध्ये गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी जादा पैसे आकारात असतील तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला यावेळी त्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड सुद्धा रद्द केला जाईल असे सांगितले.
अनेक जण राज्यभरातील सर्व महिला गृह लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सेंटरवर अर्ज भरण्याकरिता जात आहेत मात्र त्याचा गैरफायदा अनेक ऑनलाइन सेंटर चालक घेत असल्याची तक्रार समोर आली आहे जर असे उघड केस आल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मंत्री हेबाळकर यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिला.
पोलीस स्थानकात किंवा जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधित तक्रार करावे तसेच संबंधितांवर फौजदार गुन्हा दाखल करण्यात येईल इतकेच नव्हे तर या योजनेसंदर्भात तहसीलदार पीडीओ किंवा कोणीही बेजबाबदारीने वागत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.