This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांशी साधला संवाद*

*मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांशी साधला संवाद*
D Media 24

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

बेंगलोर: येथील विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये भोजनाच्या वेळी कर्नाटकच्या महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधून गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज केला काय म्हणून विचारणा केली.
यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी अजून नाही मॅडम असे उत्तर दिले.त्यावर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मी तुम्हाला नंबर देते.

त्या नंबरवर एस एम एस करा असे सांगून त्यांना मोबाईल नंबर दिला.शक्य तितक्या लवकर एस एम एस करा असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेचा सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने शुभारंभ केला आहे.गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन कर्नाटक सरकारने केले आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील सगळ्या महिलांनी घ्यावा यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रयत्नशील आहेत.गृहलक्ष्मी योजने अंतर्गत कुटुंबातील एका महिलेला दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply