घटप्रभा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने नदीतील लाखो मासे मृत
बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने नदीतील लाखो मासे मृत झाले आहेत.बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील नल्लानट्टी गावाजवळील घटप्रभा नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पडला आहे. नल्लानट्टी गावच्या नदी पात्रा प्रमाणे
बळोबाळ, बिरनगट्टी गावच्या नदी पात्रात देखील लाखो मासे मृत झाल्याचे पाहायला मिळते.
दरवर्षी जून महिन्यात पावसामुळे नदीत भरपूर पाणी असते पण यावर्षी मान्सून लांबल्याने नदी कोरडी पडली आहे आणि त्याचा फटका जलचराना बसला आहे.नदीच्या पात्रात मृत माशांचे ढीग पाहायला मिळत आहेत.मृत माशांची दुर्गंधी सुटली असून त्यामुळे आता रोगराई पसरते काय अशी भीती नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना वाटत आहे.