म्हादई योजना त्वरित राबवावी या मागणीसाठी मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष समिती आणि महिला संघर्ष समिती यांच्या वतीने चाबूक आणि मुसळ मोर्चा काढण्यात आला.उत्तर कर्नाटकातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पाची लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली.
बेळगावातील वीर राणी कित्तुर चन्नमा चौकापासून चाबूक आणि मुसळ मोर्चा काढण्यात आला.गेल्या साठ वर्षापासून हा प्रकल्प प्रलंबित आहे.गोवा सरकार या प्रकल्पात अडकाठी आणत आहे.पंधरा दिवसात राज्य आणि केंद्र सरकारने या बाबत कार्यवाही करावी अन्यथा दिल्लीत आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना संघर्ष समितीने निवेदन दिले.