*चलवेनहटीत करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
चलवेनहट्टी गावातील प्राथमिक शाळेमध्ये आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर हुंदरे हे होते यावेळी सातवी इयत्तेत प्रथम क्रमांकाने पुनम अमोल बडवानाचे तर द्वितीय श्रीकला भैरवनाथ बडवानाचे तसेच दहावी इयत्तेत प्रथम क्रमांक ऋतिका मनोहर पाटील तर द्वितीय सुनिता अमोल बडवानाचे अशा या विद्यार्थिनीं उत्तीर्ण झाल्या होत्या या विद्यार्थिनींचा गौरव सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी आपले मनोगत मांडताना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसह तसेच क्रीडा क्षेत्रातही अव्वल कामगिरी करून चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणार असून आपण हा गौरव करताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करावी यासाठी आपण हा गौरव सोहळा आयोजित केला आहे असे सांगितले तर रेखा पाटील यांनी मनोगत मांडताना विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाकडे अधिक लक्ष दिल तर आपण प्रथम क्रमांकाला साद घालू शकतो असा सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात मनोहर हुंदरे यांनी मनोगत मांडताना सैनिक संघटनेच्या वतीने हा सोहळा आयोजित करताना खरोखरच विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेतली आहे आणि यासाठी आपण नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहात त्याबद्दल आपण शाळा सुधारणा समितीच्या वतीने आपण आपले आभारी आहोत आणि यानंतर सुध्दा आपण अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना ही आपली शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी हातभार लावावा अशी विनंती केली आणी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणात आपले विद्यार्थी नेहमीच अव्वल कामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत असतात आशा विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या प्रोस्तोहानात अधिक भर पडत असते असे मनोगत व्यक्त केलं तत्पूर्वी शाळेचे मुख्याध्यापक एम.सी.वार्णुळकर यांनी प्रास्ताविक केलं शारदा चौगुले यांनी सूत्रसंचालन केलं
आभार प्रदर्शन टी जी नगरकर यांनी केले यावेळी भरमा पाटील,नारायण हुंदरे, निगाणी हुंदरे,जोतिबा बडवानाचे,निगाणी कुमाणा हुंदरे,मल्लाप्पा हुंदरे,बाबू पाटील ग्रामपंचायत सदस्या रेखा पाटील,रेणुका सनदी, शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा दीपा पाटील, गजानन बडवानाचे,महेश हुंदरे, इराप्पा घसारी,कलावती हुंदरे, लक्ष्मी पाटील,रेणुका अलगोंडी, शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते