बेळगाव ता,2. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तर अध्ययस्थानी किशोर काकडे उपस्थित होते,
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, सविता पाटणकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले याप्रसंगी पाहुण्यांचे हस्ते 2023 साली दहावी परीक्षेत शाळेत अव्वल आलेल्या जान्वी जोशी ,अस्मिता लोहार, श्रद्धा ढवळे, वैभव लोणी, नम्रता कारिगौडर, ओम बोंगाळे, श्रुती सावंत ,रक्षित अणवेकर, सोहम गुरव ,गणेश गुंजीकर, साहिल गुडेकर ,आदिती हिरेमठ, तसेच आदर्श शिक्षिका म्हणून अनुराधा पुरी,व लक्ष्मी पाटील तसेच शाळेच्या शिपाई भारती बाळेकुंद्री व रेणुका काळे यांचा स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी किशोर काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जनकल्याण ट्रस्टच्या सदस्य गौरी देव, नीलिमा गाडगीळ ,गीता हेगडे, रंजनी गुर्जर, आशा कुलकर्णी गीता वरपे , सुजाता पाटील,शामल दड्डीकर,विनाश्री तुक्कार, किरण पावसकर क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील मयुरी पिंगट,आदीसह शालेय शिक्षक वर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धा मेंडके यांनी आभार मानले. शांतीमंत्रानी कार्यक्रमाची सांगता झाली.