जिजामाता हायस्कूल येथे’ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार’ व पालक मेळावा संपन्न
बेळगांव:मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल येथे’ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार’ व ‘संवाद पालकांशी’ हा 8वी विद्यार्थिनींसाठीचा पालक मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.डी. पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.श्री.नागेंद्र कल्लाप्पा सुभांजी उपस्थित होते.
तसेच पालक प्रतिनिधी म्हणून श्री कल्लाप्पा पाटील व श्रीमती स्नेहलता देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती फोटो पूजन व दिपप्रज्वलनाने झाली.दहावी परीक्षेमध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेच्या वतीने शिक्षिका श्रीमती आशा पवार यांनी पालकांना शाळेची शिस्त, मुलींचा अभ्यास,मोबाईलचा दुरुपयोग इत्यादी विषयी मार्गदर्शन केले.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. नागेंद्र सुभांजी यांनीही शाळेविषयी आपले विचार मांडले.तसेच मुलींना उत्तम अभ्यास करण्याचे आवाहन केले.यानंतर व्यासपीठावर उपस्थित आई पालक व बाबा पालक यांनीही आपले विचार व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात श्री. एन. डी. पाटील सर यांनी मुलींच्या अभ्यासात पालकांचे योगदान याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. सहशिक्षिका श्रीमती एन्. बी. पावशे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीमती योगिता सावी यांनी आभार मानले.