गुरुपौर्णिमा निमित्त संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार.
बेळगांव ता,3.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही क्षेत्राकडे वळले तरी करीयर होऊ शकते. त्यासाठी शालेय शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मनोगत जीआयटी कॉलेजचे माजी प्राचार्य जयंत कित्तुर यांनी गुरूपौर्णिमा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी काढले .
संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार,शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी,अनंतराम कल्लुरय्या,माधव पुणेकर,रंजनी गुर्जर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव किशोर काकडे या मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवंत व क्रिडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चैतन्य कारेकर,वेदिका बुवा,निधी कदम, कुणाल देसाई, पृथ्वीराज शिंदे, आदित्य डांगे ,आशुतोष राणा, मेघा धामणेकर, मनस्वी इंगळे ,साक्षी कम्मार, जनार्दन लोहार, रुद्राक्ष मुरडे, लक्ष्मी कुमशी ,चिन्मय सिद्धांती , जान्वी जोशी, रक्षिता अणवेकर, अस्मिता लोहार, सानिया मुल्ला, श्रद्धा ढवळे, अमूल्या अंगडी, नम्रता करीगौडर , आदिती हिरेमठ, प्रथा चौगुले ,गणेश गुंजीकर, तसेच आदर्श शिक्षिका म्हणून धनश्री सावंत, रिटा धोंगडी शाळेचे शिपाई बसवंत पाटील,लक्ष्मी पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली जोशी,प्रास्ताविक आशा कुलकर्णी तर देणगीदारचे स्वागत व आभार ऋतुजा जाधव किरण पावसकर यांनी यांनी मानलें
कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.