बेळगांव: दानम्मा मंगल कार्यालय बेळगाव येथे झालेल्या ६ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे मध्ये बेन्सन्स इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी १२ सुवर्णपदके १५ रौप्य आणि १५ कास्य पदके मिळवली. या ६व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत एकूण १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय स्पर्धा बेळगाव जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.तर या विद्यार्थ्यांचे बेन्सन्स इंटरनॅशनल शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तसेच या विद्यार्थ्यांना आत्मरक्षण कला आली पाहिजे आणि त्यांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजेत. यासाठी शाळा त्यांना सदैव आत्मरक्षण कला शिकवण्यासाठी तत्पर्य असते.
या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य सौ मनीषा महाजन, शाळेच्या व्यवस्थापिक श्रीमती सायमा जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर देतात. तसेच रमजान रायचूर व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.