हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा याचे नियोजनार्थ बैठक
15 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार्या हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा याचे नियोजन कसे करावे यासाठी छत्रेवाडा अनसुरकर गल्ली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी पदयात्रा ची सुरुवात कुठून करायची, नियोजन कश्या पद्धतीने असावे, याचा प्रचार कार्यकर्त्यांनी कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच हिंदवी स्वराज्य ध्वजस्टंभ उभारला जावा याबद्दल आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे,जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकीतकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुचंडिकर तसेच ग्रामीण विभागातील व शहर विभागातील अनेक धारकरी उपस्थित होते. पुढची व्यापक बैठक 6 ऑगस्ट रोजी शहर भाग व 7 ऑगस्ट रोजी ग्रामीण भाग यांची होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले.