निपाणीत उद्या स्मृती इराणी यांची सभा
भारतीय जनता पक्षाच्या निपाणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ २५ रोजी सायंकाळी चार वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निपाणी शहरातील विद्या संवर्धक मंडळाच्या न मैदानावर होणाऱ्या या जाहीर सभेत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय महिला केंद्री व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी व केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी उपस्थित राहणार आहेत.