This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*सरकारी शाळा वाचवा अभियान अंतर्गत खानापूर समितीची बैठक संपन्न*

*सरकारी शाळा वाचवा अभियान अंतर्गत खानापूर समितीची बैठक संपन्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व सरकारी शाळा वाचविणे अभियानच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील शाळा सुधारणा समितीची बैठक बोलावण्यात आली यावेळी या बैठकीला मार्गदर्शक म्हणून गंगाधर गुरव तसेच मनोहर हुंदरे हे उपस्थित होते यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष तसेच सदस्यासह शिक्षण प्रेमी उपस्थित होते. यावेळी गंगाधर गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण आपल्या शाळच्या बाबतीत मतभेद तसेच राजकारण हे बाजूला ठेवून आपण सर्वांनी कार्यरत राहा तरच तुम्ही सरकारी शाळा वाचविण्यात यशस्वी व्हाल खानापूर सारख्या आपल्या दुर्गम भागात शाळांचा बाबातीत सरकार नेहमीच दुर्लक्ष करत असतंय त्यामुळे सर्वानी संघटित होऊन आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.

तर मनोहर हुंदरे यांनी खासगी शाळा म्हणजे कर्क रोगाप्रमाणे लागलेला विळखा आहे आणी या समस्यावर‌ उपाय म्हणजे सरकारी शाळेत पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केलं पाहिजे त्याचं बरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी अधिक लक्ष द्यावे आपल्या अध्यक्ष किंवा सदस्य पदाच्या कार्यकाळात आपल्या कारकीर्दीत शाळेकडे लक्ष देऊन आपली शाळा उत्तम दर्जाची कशी होईल याकडे लक्ष द्यावे तसेच बरेचसे सदस्य बैठकीला दाडी मारत असतात तर असे न करता सर्व सदस्यानी शाळेच्या कार्याला वेळ दिल्यास आपली शाळा नक्कीच चांगल्या दर्जाचे होईल यांत तीळ मात्र शंका नाही अलिकडे आपली मातृभाषेतील शिक्षणाला लाथाडून आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा कल वाढला आहे पण मातृभाषेतील शिक्षण हेच सर्व गुणसंपन्न असतं.

अलिकडे सर्वच आपापल्या संघटना करुण एक जुटीने लढत आपले हक्क मिळवत आहेत त्यामुळे याच धर्तीवर आपण सुध्दा शाळा सुधारणा समितीचे सदस्य या नात्याने एकजूट दाखवत संघटना बाधून आपल्या समस्या सोडवून घेतल्या पाहिजेत शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर आणि तरच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारी शाळेकडे वळतील असे मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित अध्यक्ष तसेच सदस्य यांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी पुढील बैठकीत या समस्यासह इतरांचा विविध समस्यांवर चर्चा करुण शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला जाईल असे ठरविण्यात आले यावेळी अनिल देसाई यांनी सुत्रसंचालन केले तसेच विश्वभारती कला क्रीडा संघटना खानापूर शाखा यांच्या वतीने मनोहर हुंदरे तसेच गंगाधर गुरव यांचा मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावेळी मष्णु चोपडे,रामाक्का हणबर, बुवाजी,दामोदर कणबरकर, विनोद गुरव इरफान तालीकोटी आदींनी मनोगत व्यक्त केले.

तर यावेळी सुनीता येरमाळकर, गंगाराम गुरव, विश्वनाथ बुवाजी, प्रमोद कोलेकर, रामनाथ बुवाजी, शशिकांत जाधव, विनायक भुते, संदीप गुरव,सहदेव गावकर,महेश पाटील, महेश सावंत,ईश्वर बारगावकर, अपय्या कोलेकर,अमर गुरव,परशुराम पाटील, गणपती मुतगेकर, गोपाळ पाटील, रामन्ना नंदा, सदानंद लोहार,नारायण पडवळकर, विठ्ठल राऊत, रेणुका घाडी, कृष्णा भरणगेकर, शिवाजी घाडी, संदीप घाडी,संजय गुरव संजय करंबळकर, दशरथ गणेबैलकर,मारुती चोपडे, नागराज देसाई दामोदर कुसुमळकर, कल्लाप्पा गुरव विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष सेक्रेटरी आदी मान्यवर उपस्थित होते तर मोहन गुरव यानी अभार मानले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24