This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Education

*MD (मेडिसिन)पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण*

*MD (मेडिसिन)पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण*
D Media 24

अक्कोळ येथील डॉ.निखिल संजय पंतबाळेकुंद्री हे नुकत्याच झालेल्या MD (मेडिसिन)पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज व आचार्य विनोबा भावे रुग्णालय, वर्धा (नागपूर) येथे तीन वर्षाचे प्रशिक्षण व नुकतीच परीक्षा झाली.

एमबीबीएस शिक्षण शासकीय ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे.रुग्णालय, मुंबई येथे झाले आहे. त्यावेळीही उत्कृष्ट क्रमांक पटकावला होता.तसेच टाटा फाउंडेशन व एनएस फाउंडेशनची तीन वर्षाची स्कॉलरशिप सुद्धा मिळवली होती.

अक्कोळ सारख्या ग्रामीण भागात राहून प्राथमिक व माध्यमिक सीबीएसई शिक्षण निपाणी येथे घेतले आहे. कोटा (राजस्थान) येथे दोन वर्षे अखिल भारतीय वैद्यकीय नीट-प्रवेश परीक्षेची तयारी करून उत्तुंग यश मिळवले होते.

एम.डी परीक्षेतील दैदिप्यमान यशाबद्दल डॉ. निखिल पंत यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
पुढील दोन महिन्यात सुपर स्पेशलिटी (DM) उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.
अक्कोळ ग्रामीण परिसरात गेली तीन पिढ्या शतकोत्तर समाजसेवा,रुग्णसेवा देणाऱ्या डॉ.श्रद्धा व डॉ.संजय अरुण पंतबाळेकुंद्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव व श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचे पाचव्या पिढीचे वंशज आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.