बेळगांव:नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरू नये याकरिता महापौर उपमहापौर यांनी शहराच्या विविध भागात भेट देऊन अधिकाऱ्यांसह पाहणी केली तसेच गटारी नाले साफ करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील नाले गटारी ओसंडून वाहत आहेत त्यामुळे या नाल्यातुन पाणी सुरळीत वाहण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी महापौर आणि उपमहापौर यांनी माळ मारुती वसाहत बुडा ऑफिस मागील अजदखान सोसायटी शिवाजीनगर शाहूनगर शेवटचा बस स्टॉप यासह आदी भागांना भेट देऊन आपल्या गटारीची पाहणी केली तसेच सांडपाण्याचे निचरा व्यवस्थित व्हावा पाणी साचून वसाहतीत शिरू नये आणि याचा त्रास नागरिकांना होऊ नये याची दक्षता घेऊन योग्य ती उपायोजना राबविण्याच्या सूचना यावेळी उपमहापौर आणि महापौर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
तसेच तुंबलेल्या गटारीची पाहणी करून तातडीने साफसफाई करण्याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी केली.
यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक राजशेखर दोन्ही रेश्मा बैरकदार बाबाजान मतवाले प्रवीण पाटील रवी बागी शंकर चोरगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.