गोधोळी ग्रामपंचायत मध्ये नरेगा योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार
गोधोळी ग्रामपंचायत मध्ये नरेगा योजनेअंतर्गत केलेला भ्रष्टाचार समोर आला आहे नरेगा योजनेअंतर्गत कामगारांना पैसे देण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच ज्या व्यक्तीने जास्त कामे केली आहेत. त्या व्यक्तीच्या खात्यावर कमी पैसे घालण्यात आल्याची बाब देखील उघड झाली असल्याने गोधोळी ग्रामपंचायत मध्ये असलेल्या नरेगा योजनेअंतर्गत महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.
रोजगार कामासाठी गरीब जनता आपल्या घरातील सर्व कामे बाजूला ठेवून पोटासाठी कामाला जाते. मात्र काम करणाऱ्याला पैसे नसून न काम करणाऱ्या च्या खात्यावर पैसे घालण्यात येत आहेत.
त्यामुळे ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणून देण्याकरिता आज गोधोळी ग्रामपंचायत मधील नरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी आंदोलन छेडले आणि आपल्या मागण्याची पूर्तता व्हावी अशी मागणी केली.