गवंडी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
जखमी गवंडी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हलगा येथील यल्लाप्पा मोनाप्पा मोरे (वय वर्षे ५७ )असे या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. शुक्रवार दिनांक १० रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यल्लाप्पा मोरे हा गवंडी काम करत होता. गवंडी काम करत असताना इमारतीवरून चार दिवसांपूर्वी पडून तो जखमी झाला होता, अधिक उपचाराकरिता त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, उपचार सुरू असतानाच शुक्रवार दिनांक 10 रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, तीन वहिनी,असा परिवार आहे. शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री ठीक नऊ हलगा स्मशानभूमीत अंतयात्रा होणार आहे.