सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा चौकात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सकाळी शहरातील हुतात्मा चौक येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या आठवणी यावेळी करण्यात आली.
यावेळी 1956 साली गोळीबारात हुतात्मा पत्करलेल्या महादेव बारगडी मधु बांधेकर मारुती बेन्नाळकर कमलाबाई मोहिते यासह अन्य हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रास्ताविक करताना माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांची माहिती दिली. त्यानंतर अन्य मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले.यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर रामदेव गल्ली संयुक्त महाराष्ट्र चौक खडे बाजार गणपती गल्ली मारुती गल्ली किर्लोस्कर रोड या मार्गावर श्रद्धांजली काढण्यात आली. यावेळी फेरी दरम्यान अनेकांनी घोषणा देऊन परिसर म्हणून सोडला होता
याप्रसंगी महिला आघाडीचे अध्यक्ष रेणू किल्लेेकर नगरसेवक रवी साळुंखे शिवाजी मंडोळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई नगरसेविका वैशाली भातखंडे सुधा भातकांडे माजी नगरसेवक रंजीत चव्हाण पाटील नेताजी जाधव शिवप्रतिष्ठिन हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह अन्या सीमा वासियांनी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आणि अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे अशा घोषणा दिल्या