20 वर्षानंतर हलगा येथील मरगाई देवीची यात्रा
हलगा गावची जागृत देवस्थान असलेल्या श्री मरगाई देवीची यात्रा पारंपारिक रीतीने वीस वर्षानंतर दिनांक 10 व 11 जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान पंच कमिटीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोमवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी आठ वाजता सर्व गावकऱ्यांच्या व देवस्थान पंच कमिटी यांच्या उपस्थितीत गावातील सर्व देवी देवतांची विधिवत पूजाअर्चा ओटी भरून वार उतरण्याचा कार्यक्रम पार पडण्यात येणार आहे तर दुपारी दोन वाजता श्रीमरगादेवी मंदिर पासून वाजत गाजत जाऊन श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली येथून नवीन तयार करण्यात आलेल्या देवीच्या गाड्याला पालवे जुंपून त्यांची विधीवर पूजा करून त्यानंतर वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या संख्येने गाडा निवडणूक काढून लक्ष्मी गल्लीतून प्रस्थान होऊन श्रीमरगाई मंदिराकडे आणण्यात येणार आहे.
त्यानंतर श्री मरगाई मंदिर येथे आल्यानंतर इथे रितीरिवा वाजाप्रमाणे पूजाअर्चा करून श्रीमरगाई मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे तर रात्री नऊ वाजता देवीचा गोंधळाचा आणि जागरणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
दुसरे दिवशी म्हणजे 11 जुलै रोजी सकाळी आठ वाजता रिती प्रमाणे देवीचे हक्कदार देसाई महावीर गल्ली यांच्या घरातून वाजत गाजत मानाचा नैवेद्य आणण्यात येणार आहे त्यानंतर मरगाई देवी ला विधिवत अभिषेक पूजाअर्चा करून नैवेद्य ओटी भरून देवीची महाआरती करून देवीला साकडे घालण्यात येणार आहे. नंतर देवीला दुपारी चार वाजेपर्यंत गावकऱ्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी पाच वाजता देवीची मिरवणूक मरगाई गल्लीतून वाजत सीमेपर्यंत नेऊन तेथे सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती श्री मरगाई देवी सेवा कमिटी हलगा यांच्यावतीने देण्यात आली आहे.