मराठी विद्यानिकेतन शाळेची अनोखी सहल
मराठी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाऊन त्यांना एक वेगळी अनुभूती दिली .यावेळी MLIRC) च्या कमांडो ट्रेनिंगच्या रोहिडेश्वर कॅम्पची अनोखी सहल यामध्ये करण्यात आली. याठिकाणी काही विद्यार्थी आणि शिक्षकांनी सैनिकांच्या प्रशिक्षण प्रात्यक्षिकांचा आनंद लुटला.
त्यानंतर राणी चन्नम्मा विद्यापीठ मार्गे गोरामट्टी गावात पोहोचलो. बेळगावचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ शिवाजी कागणीकर यांनी गोरामट्टीसारख्या मागासलेल्या गावाचा सहभागात्मक गाव विकासाच्या माध्यमातून अभ्यास केला यामध्ये पाणी साठवण, तलाव बांधणे, सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून स्थानिक नसलेल्या फळ रोपांची लागवड, याची माहिती दिली .
. यावेळी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्याशी परिचय व चर्चा करण्याची संधी मिळाली, यासह सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह सकाळचा योगसाधना व संगीताच्या तालावर व्यायाम केला,आणि सहलीचा आनंद लुटला .
सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व काळजी घेण्यासाठी नीला आपटे, गजानन सावंत, मंजुषा पाटील, बी.के. पाटील, माया पाटील, उषा काकतकर श्रीधर बेन्नाळकर, महेश हगीदाळे, सहदेव कांबळे, नारायण गणाचारी, पद्मजा कुर्याळकर, पूजा संताजी, पूजा प्रधान, वैजू मुंगरे आणि सुमित्रा , शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.