<span;>मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत व्ही.एस.हसबे यांचा सदिच्छा कार्यक्रम संपन्न
<span;>बेळगांव:31 जुलै 2024 रोजी मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल चे मुख्याध्यापक वि.ए हसबे यांचा सदिच्छा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष विनायक बसवंत घसारी प्रमुख पाहुणे म्हणून करमळकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बीबी पाटील सर, सत्कारमूर्ती व्ही ए हसबे यांच्या सौभाग्यवती पद्मा मातोश्री मंदा त्यांच्या कन्या संपूर्ण परिवार माझी महापौर मालोजीराव अष्टेकर मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार समाजसेवक अमर येळूरकर माजी विद्यार्थी संस्थेचे तसेच संस्थेबाह्य शाळेचे मुख्याध्यापक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुनील अशा इशस्तवनाने व स्वागतगीताने झाली.
<span;>शाळेचे विद्यार्थी कुमार समर्थ बागेवाडी, कुमार सिद्धार्थ पाटील यांनी हसबे सरांच्या अध्यक्षस्थानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
<span;>शाळेचे ज्येष्ठ शिक्षक डी.टी.सावंत यांनी त्यांच्या प्रदीर्घ कार्याबद्दलचा आढावा घेतला. मालोजीराव अष्टेकर अमर येळ्ळूरकर,अनिल अजगावकर,प्रफुल शिरवळकर, मायाप्पा पाटील यांनी हाडाचे शिक्षक कसे असतात गणित विषयावर असलेला त्यांचा पगडा त्यांनी शिकवलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात कसे चमकत आहेत. त्यांच्यात असलेल्या कलागुण हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शाळेच्या वतीने व्ही.ए.हसबे सर व त्यांच्या सौभाग्यवती,मातोश्री यांचा सर्व शिक्षकांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी विद्यार्थी त्यांच्या मित्रपरिवार ,विविध शाळेतून आलेले मुख्याध्यापक,शिक्षक इतर क्षेत्रातील मान्यवरांनी ही शाल,श्रीफळ व भेटवस्ते देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही सरांना भेटवस्तू दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी माजी विद्यार्थी सचिन उसुलकर यांनी शाळेसाठी दोन संगणक भेट दिली. १९८७ -१९८८ सालच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते २०२३-२४ सालात एस.एस.एल.सी परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.बी.मास्तोळी यांनी केले. सूत्रसंचालन एम.के.पाटील व के.एस.मोरे यांनी केले.आभार के.के.फडके यांनी मांडले.