मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल च्या बेळगाव दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न
बेळगाव: इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.एम.पाटील प्रमुख अतिथी म्हणून मराठा मंडळ पि.यू.कॉलेजचे माजी प्राचार्य श्री.एस.एस पाटील श्री डॉ ऋतुराज चौगुले, माजी सैनिक संदीप मलाई पालकांच्या वतीने श्री गावडू मोनाप्पा पाटील सौ.जयश्री चोपडे शिक्षकांच्या वतीने श्री डी.टी.सावंत, श्री.पी.बी. मस्तीहोळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डी.टी. सावंत यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री.पी.बी.मास्तीहोळी यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दहावीच्या सहामाही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या पहिल्या ५ आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मराठा मंडळ पि.यू कॉलेजचे माजी प्राचार्य.एस. .एस.पाटील यांनी बोलताना दहावीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या योग्य शाखेची निवड करून आपले देह कसे गाठावे हे सांगितले.तसेच डॉ ऋतुराज चौगुले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधित करताना समूपदेशनाचे मार्गदर्शन केले. तसेच माजी सैनिक श्री. संदीप मलाई यांनी अभ्यासाचे महत्त्व सांगून देश सेवेबद्दल मार्गदर्शन केले.पालकांच्या वतीने श्री गावडू पाटील,श्री जयश्री चोपडे कु.अमित मुतकेकर यांनी विद्यार्थी व पालकांच्या समस्या बद्दल चर्चा केली.
अध्यक्षस्थानी समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक बी.एम.पाटील सरांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या कर्तुत्वाचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.के.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.एम.एम.कणबरकर मॅडम यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गांनी सहकार्य केले.