मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये ‘युथ रेड क्रॉस डे’ उत्साहात साजरा
बेळगाव, 14 ऑगस्ट 2025: मराठा मंडळ पॉलिटेक्निक महाविद्यालयात युथ रेड क्रॉस डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्रीती कुसागल, उपप्राचार्या – मराठा मंडळ डेंटल कॉलेज, बेळगाव उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तृतीय सेमिस्टर सीएस विभागातील दीपिका आर. सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. सूर्यवंशी यांनी युथ रेड क्रॉस समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाला YRC समन्वयक श्री. जी. के. शिवयोगीमठ, सांस्कृतिक समन्वयक सौ. गौरी उप्पिन, विविध विभागांचे प्रमुख, महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी, विविध क्लबचे सेक्रेटरी, तसेच वर्गप्रतिनिधी उपस्थित होते.