बेळगाव:शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट वाजवी किमतीत दर्जेदार आंबे व मध उत्पादने पुरवण्याच्या उद्देशाने “आंबा आणि मध उत्पादन प्रदर्शन व विक्री मेळा २०२५” येत्या २६ ते २८ एप्रिल दरम्यान बेळगाव येथील हूम पार्क, क्लब रोड येथे भरवण्यात आला आहे.
या मेळ्यात शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने कापणी केलेले आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे, मध व इतर उत्पादने थेट ग्राहकांना विक्रीसाठी सादर केले जाणार आहेत. मेळा सकाळी ९:०० ते रात्री ८:०० या वेळेत सर्वांसाठी खुला असेल.
या मेळ्याचे उद्घाटन कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी,महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच बेळगाव उत्तरचे आमदार श्री आसिफ (राजू) शेठ यांच्या उपस्थितीत होणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना या मेळ्यात सहभागी होऊन उत्तम दर्जाची आंबे व मध उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
स्थळ: हूम पार्क, क्लब रोड, बेळगाव
तारीख:२६ ते २८ एप्रिल २०२५
वेळ: सकाळी ९:०० ते रात्री ८:००
हा मेळा शेतकरी-ग्राहकांमध्ये थेट संबंध वाढविण्यासाठी आणि निरोगी, नैसर्गिक फळे व मधाची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.