मल्लेश चौगुले यांची दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड
बेळगाव: दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक १५ डिसेंबर रोजी होणार आहे. आज सोमवार दिनांक ९/१२/२०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मागासवर्गीय जाती (एस सी) गटातून ४ पैकी ३ नी माघार घेऊन मल्लेश चौगुले यांची बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड केली आहे.
मल्लेश चौगुले हे सामाजिक कार्यात सदैव तत्पर असून त्यांना आंतरराष्ट्रीय डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मलेशिया, राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकार,राज्य युवा पुरस्कार कर्नाटक सरकार,कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार बेळगाव जिल्हा असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्याचप्रमाणे विविध संघटनेचे तसेच सरकारी नामनिर्देशित सदस्य,विविध पदावर कार्यरत आहेत.आज बँकेच्या कार्यालयामध्ये त्यांच्या सामाजिक कार्य पाहता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यामध्ये माजी महापौर विजय मोरे,चेतक कांबळे,कुरणे यांनी माघार घेऊन मल्लेश चौगुले यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मल्लेश चौगुले यांची दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या यशस्वी निवडी मागे बँकचे विद्यमान चेअरमन प्रदीप अष्टेकर, व विद्यमान संचालक तसेच माजी आमदार रमेश कुडची यांच्यासहित इतर मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले.