आगळ्यावेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी
बेळगांव:आदर्श नगर श्रीराम कॉलनी येथील भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने काल रविवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात आली.
आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाची कामे प्रलंबित आहेत. विकासकामां अभावी या परिसरातील जनतेला अनेक नागरी समस्यांना सातत्याने तोंड द्यावे लागत होते. गेल्या दोन वर्षात आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीराम कॉलनी परिसरातील अनेक विकास कामांना चालना मिळाली आहे.
रस्ते, गटारी,नाला, पथदीप आदी महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत.अद्यापही काही कामे सुरू आहेत. आमदार अभय पाटील यांनी हाती घेतलेल्या विकास कामांचा प्रभाव आणि भारतीय जनता पक्षाचे मंगेश पवार यांचा प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क यामुळेच पवार हे नगरसेवकपदी निवडून आले आहेत.
आमदार अभय पाटील यांनी सरकार दरबारी मंजूर करून घेतलेल्या विविध विकास कामांचा योग्य पद्धतीने व्हावी,यासाठी नगरसेवक मंगेश पवार जातीने प्रयत्न करत आहेत.त्यामुळे श्रीराम कॉलनी परिसरातील नागरिकात आमदार अभय पाटील आणि नगरसेवक मंगेश पवार यांनी केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
इंग्रजी वर्षातील पहिल्या महत्त्वाच्या मकर संक्रांति सणाचे औचित्य साधून, नगरसेवक मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनानुसार परिसरातील महिला कार्यकर्त्यांनी श्रीराम कॉलनी परिसरातील महिलांनी जनजागृती पदयात्रा आयोजित केली. त्याचबरोबर घरोघरी जाऊन तिळगुळही वाटप केले.
माया यल्लाप्पा बसरीकट्टी,अमृता अ.बनवे,.सुमन य.माळवी,रूपा सु.हावळ,विद्या पा.मिराशे,सिमा सु कुसाने,अर्चना सा.कुसाने,सुनिता भै.कुसाने,अन्नपूर्णा अ.कुडतरकर यांच्यासह अन्य महिला भगिनी ही यावेळी उपस्थित होत्या.