*महेश गवळी ठरला हिंडलगा श्री किताबचा मानकरी*
बेळगाव:जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि श्री हनुमान स्पोर्ट्स क्लब हिंडलगा यांच्यावतीने बॉक्साईट रोड येथील कलमेश्वर मंदिराजवळ आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महेश गवळी ‘हिंडलगा श्री’ किताबाचा मानकरी ठरला. उमेश गंगणे बेस्ट पोझर ठरला.
१३ वी हिंडलगा श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, हिंडलगा क्लासिक टॉप टेन ग्रा. पं. पातळीवरील आणि आठवी रुद्र क्लासिक टॉप टेन जीम पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रतिमा व हनुमान प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. ५५ किलो गटात सुनील गुजनाळ, अनिकेत शिंदे, नितीन होसूरकर, रोहित मोरे व आदर्श येळ्ळूरकर. ६० किलो गटात प्रितम कोलकार, साईनाथ कार्वेकर, नितीन पाऊसकर, सागर कळीमनी व शुभम मुतगेकर. ६५ किलो गटात उमेश गंगणे, श्रीधर हंडे, साहिल बडवाण्णाचे, सूरज पाटील व श्रनिवास देसूरकर. ७० किलो गटात ऋतिक पाटील, संकेत सुरुतेकर, तेजस जाधव, अजित पाटील व मीत खटावकर.
७५ किलो गटात बसाप्पा कोणेकेरी, मनीष सुतार, दीपक गावडे, आकाश जाधव, वेदांत कलम. ८० किलो गटात महेश गवळी, आकाश लोहार, श्रीनाथ तेजम, भूषण सावंत व अनिकेत पाटील. ८० वरील गटात गजानन काकतीकर, मलिक मुजावर, सँडी सेट, किरण जाधव व रोहन केसरकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला. किताब विजेत्याला दहा हजार रुपये तर बेस्ट पोझरला दोन हजार तसेच पदक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे रुपये तीन हजार, दोन हजार, एक हजार व पाचशे रुपयांची दोन बक्षिसे देण्यात आली.
राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय सुंठकर, युवानेते आर. एम. चौगुले, हिंडलगा माजी ग्रा.पं. अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, स्नेहल कोलेकर, अशोक कांबळे, जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष महेश सातपुते, सरचिटणीस राजेश लोहार, कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे, आप्पाणा मडीवाळ, रवी कोकीतकर, गणपत पाटील, नागेश किल्लेकर, रणजित किल्लेकर, परशराम काकतकर, विजय चौगुले आदी उपस्थित होते.