महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त बेळगावात शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत विविध कलापथके सहभागी झाली होती .विविध रंगाचे आणि आकाराची पक्षांची वेशभूषा केलेल्या कलाकारांनी शोभायात्रेची शोभा वाढवली.विदूषकाचे वेष परिधान केलेल्या कलाकारांनी केवळ लहान मुलांचेच नाही तर मोठ्यांची देखील करमणूक केली.
भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्याविष्कार दाखवणारे कलाकार देखील शोभायात्रेत सहभागी झाले होते.धनगरी ढोल पथकाने देखील शोभायात्रा पाहण्यास आलेल्यांची आपल्या वादनाने मने जिंकली.शोभायात्रेत सुहासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.सजवलेल्या रथामध्ये महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती ठेवण्यात आली होती.किल्ला येथील अशोक चौकापासून प्रारंभ करण्यात आलेल्या शोभायात्रेची सांगता कुमार गंधर्व रंग मंदिर येथे झाली.