बेळगाव:शहरा जवळील मुट्यानट्टी गावात विविध संघटनांच्या वतीने आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगाव उत्तर आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी मुट्यानट्टी गावचे कर्नाटक डिफेन्स फोरम संघटनेच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला. आमदारांनी मुट्यानट्टी गावचा विकास व शैक्षणिक खेळाला अधिक महत्व दिले जात असल्याने बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गावातील प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संमेलनात मुलींची उत्तम कामगिरी केली आहे.
यावेळी काँग्रेसचे युवा नेते अमन सेठ ,गुलाप्पा दड्डी, सिद्धप्पा गुरुवा,सिद्धराय गुरुवा ,व विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.