महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महामोर्चा यशस्वी करावा असे जाहीर आवाहन
मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या वतीने कन्नड सक्तीच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी युवा समिती सिमाभागच्या वतीने जाहीर आवाहन करण्यासाठी
पदाधिकाऱ्यांची बैठक मराठा मंदिर येथे बोलविण्यात आली होती.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते या कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करताना बैठकीचा उद्देश स्पष्ट केले.
समिती नेते महादेव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्याला मातृभाषेत कागदपत्रे मिळण्याचा अधिकार असताना आपल्यावर कान्नडी भाषेची सक्ती केली जात आहे याचा विरोध केला पाहिजे असे सांगितले
तर शिवाजी हावळाण्णाचे यांनी सुध्दा आपण सिमाभागात मराठी बहुभाषिक असून आमच्या पासुन आपले हक्क हिरावून घेतले जात आहेत त्यामुळे आपण सर्वांनी तीव्र विरोध केला पाहिजे असे सांगितले.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, यांनी मनोगत व्यक्त सीमाप्रश्न न्यायालयात आहे तो सोडविण्यासाठी आपले नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेसाठी मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले
मोतेस बारदेशकर यांनी आपण मराठी भाषिकांना मराठीत कागदपत्रे मिळाली पाहिजेत यासाठी आंदोलन करावे लागत हे दुर्दैव असून बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अपमान याठिकाणी वारंवार केला जात आहे.त्यामुळे आपण आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा तीव्र विरोध केला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
शिवाजी मंडोळकर, यांनी महाराष्ट्र सरकारने ठोस कारवाई केली पाहिजे आपण या सिमाभागात रस्तावरील लढाई लढत असताना महाराष्ट्र सरकार उदासीन आहे याचा फटका सिमाभागला बसत असल्याचे सांगितले.
राजू पाटील यांनी आपण तीव्र विरोध करुण कान्नडी सक्ती थांबविण्यासाठी प्रयत्न करुया असे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्यावरील अन्यायचा पाडा वाचताना या अन्यायचा विरोध सर्वांनी जात धर्म पक्ष विसरुन कान्नडी सक्तीच्या विरोधातील मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी प्रविण रेडेकर, नारायण मुंचडीकर, अशोक घगवे जेष्ठ नेते लक्ष्मण होनगेकर, विजय जाधव, इंद्रजित धामणेकर, अभिषेक कारेकर, रिचर्ड्स अँथोनी,सुरज पेडणेकर, प्रतिक गुरव, शुभम जाधव, आदी उपस्थित होते.