*सीमाप्रश्नी निर्णायक लढ्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग*
अध्यक्षपदी शुभम शेळके तर कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील,उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक कोरे गल्लीचे ज्येष्ठ पंच व समितीचे ज्येष्ठ नेते शिवाजी हवळाणाचे यांच्या अध्यक्षतेखाली हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडली, सुरुवातीला हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक करतांना बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, व सिमालढ्याला बळकटी देण्यासाठी आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न पुन्हा जोमाने लढवून येत्या काळात सीमाप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी युवकांची विस्तृत संघटना व कार्यकारिणी असावी म्हणून बैठक बोलविल्याचे सांगितले,
केंद्राने या प्रश्नांची दखल घेवून हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा आणि या लढ्यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मत तालुका आघाडीचे सचिव शंकर कोनेरी यांनी व्यक्त केले,
तसेच केंद्रामध्ये सीमा प्रश्नाची दखल घ्यावी यासाठी कार्यरत असणाऱ्या युवकांची एकसंघ संघटना स्थापन करण्यात यावी, असे डॉक्टर नितीन राजगोळकर यांनी सांगितले,
सिमाभागात सिमाप्रश्नासाठी वेगवेगळ्या संघटना कार्यरत असून त्यासाठी युवकांची एक शिखर समिती म्हणून संघटना स्थापन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि *महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग बेळगाव या नावाने संघटना स्थापन करण्यात आली*
यावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी विचार मांडले व उहापोह केला, त्यानंतर संघटनेचे नाव निश्चित करून संघटनेच्या अध्यक्षपदी युवा नेते शुभम शेळके यांची निवड करण्यात आली, खानापूर युवा समीतीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड सर्वानुमते करण्यात आली, सध्या तीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, याला गजानन शहापुरकर यांनी अनुमोदन दिलेअसून येत्या काही दिवसात उर्वरित पदे व वेगवेगळ्या भागातून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असून सीमाप्रश्नी पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे,
नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन निपाणीचे सुनील किरळे यांनी केले व संघटनेला पुढील कार्यास
शुभेच्छा दिल्या.
या बैठकीला बेळगाव तालुका आघाडीचे अध्यक्ष राजू किनयेकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर,बसवंत घाटेगस्ती,रामचंद्र कुद्रेमनीकर,संदीप मोरे,मयूर बसीरकट्टी,चंद्रकांत पाटील,यल्लाप्पा पाटील,मनोहर हुंदरे,प्रवीण रेडेकर,पीयूष हावळ,रमेश माळवी,अशोक घागवे,विनायक हुलजी,मल्हारी पावशे,अनिल हेगडे,भागोजी पाटील,सचिन दळवी,सतीश चौगुले,किरण मोदगेकर नारायण मुचंडीकर,शांताराम होसुरकर,लक्ष्मण किल्लेकर, शुभम जाधव,अभिषेक कारेकर,अशोक डोळेकर,इंद्रजीत धामणेकर,दत्ता येळूरकर,जोतीबा,येळ्ळूरकर,अरुण जाधव,अभिषेक पवार,प्रशांत मयेकर,सुरेश दरेकर, सुरज काकडे,अंकुश पाटील,बाबू पावशे, सागर सागावकर,जितेंद्र शिंदे,यल्लाप्पा पाटील,चेतन चौगुले,अमोल मोरे,सतीश चौगुले,रमेश कुंभार,शेखर पाटील,सागर कणबरकर,निखिल देसाई,सांगलीहुन रविकिरण काशीद व सहकारी, निपाणी विभागाचे युवा समिती सहकारी उपस्थित होते. शेवटी नारायण मुचंडीकर यांनी आभार मानले.