ज्योतिबा मंदिराच्या यात्रेची महाप्रसादाने सांगता
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही परंपरेप्रमाणे शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या पाचव्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथून चव्हाट गल्ली येथील देव दादा इरापा दादा यांच्या मानाची सासन काठी दहा दिवसांची पायी वारी केल्यानंतर आज पुन्हा माघारी बेळगावला परतली.
27 मार्च रोजी बेळगाव येथून चव्हाट गल्लीतून शासन काटे आणि बैलगाड्या कोल्हापूर वाडी रत्नागिरी येथे झालेल्या प्रवास केल्यानंतर सर्व बैलगाड्या आणि शासनकाठी तसेच भावी ज्योतिबा डोंगरावर पोहोचले या ठिकाणी पाच दिवसांचा मुक्काम करून चैत्र यात्रा संपवून पुन्हा सर्व भाविक बैलगाडी आणि सासनकाठी घेऊन माघारी निघाले.
यावेळी पाच दिवसांचा पुन्हा प्रवास केल्यानंतर आज सर्व भाविक शिव बसवनगर येथे दाखल झाले आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले होते. तसेच यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी भेट दिली व त्यांच्या हस्ते शासनकाठीचे पूजन करण्यात आले त्यानंतर त्यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले.यावेळी जवळपास बेळगाव परिसरातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला