चलवेनहट्टी येथे महाप्रसादाचे आयोजन
चलवेनहट्टी येथील ग्रामदैवत श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे श्रावणमास निमित्त सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रावण महिन्यात दरवर्षी शेवटच्या सोमवार महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते त्या प्रमाणे या वर्षी ही चौथ्या सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सकाळी सहा वाजता ब्रम्हलिंग मंदिर देवाची पूजा केली जाईल त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केलं जाईल तसेच दुपारी तीन वाजता महाप्रसादला सुरवात होणार आहे.
तरी सर्व भाविकांना दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच गावातील स्मशानभूमीत अतंविधिच्या ठिकाणी चौथरा बांधणे व शेड उभारणीच्या कार्याचे भुमी पुजन सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे तरी गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य तसेच देवस्थान जिर्णोद्धार कमिटीने केले आहे.