गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : श्रीगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे वितरण आमदार अभय पाटील यांचे बंधू श्री शितल पाटील यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमात एंजल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. मीनाताई बेनके यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा पार पडला. तसेच या प्रसंगी बेळगाव शहराच्या उपमहापौर वाणी जोशी, वॉर्ड क्र. २१ च्या नगरसेविका प्रीती कामकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाला नगरसेवक जयंत जाधव, समाजसेवक विनायक कामकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशभक्ती, सांस्कृतिक वातावरण व समाजातील सर्व घटकांचा सहभाग यामुळे या सोहळ्याला विशेष उत्साह लाभला.